fbpx

पुढील वर्षी जूनपर्यंत राज्यात तीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याचं उद्दिष्ट

नागपूर : राज्यात पुढच्या जून महिन्यापर्यंत तीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपुरात मानकापूर इथं 79 व्या भारतीय रस्ते परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचं उद्घाटन काल मुख्यमंत्री फडणविस आणि केंद्रीयमंत्री नीतीन गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.

सध्या देशभर आधुनिक, शाश्वत आणि सुरक्षित रस्ते बांधणीला प्राधान्य देण्यात आलं आहे. ‘जिथे रस्ते तिथे समृध्दी’ ही विकासाची नवीन संकल्पना निर्माण झाली असून, रस्ते बांधणीबाबत राज्यांनी केंद्राकडे सतत पाठपुरावा करण्याचं आवाहन फडणवीस यांनी विविध राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केलं.

प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील रस्त्यांचं जीवनमान वाढविण्यावर केंद्र शासनाचा भर आहे. जगातील नवनवीन आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरातून हे शक्य होणार असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.