औरंगाबाद: गेल्या तीन वर्षांपासून संपूर्ण औरंगाबादकरांचे लक्ष लागलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अखेर औरंगाबादेत स्थानापन्न झाला आहे. १० फेब्रुवारी रोजी त्याचे अनावरण केले जाणार आहे. मात्र पुतळ्याच्या उद्घाटनावरून आता मोठ्या प्रमाणावर राजकारण होत आहे. मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमने पुतळ्याचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या हस्ते केले जावे असा पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे महापालिकेने पुतळ्याचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackrey) यांना बोलावण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे यावरून येत्या काळात आणखी राजकारण रंगलेले पाहायला मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्याचे आगमन शहरात झाले आहे. क्रांती चौक येथे पुतळा स्थापन करण्यात आला आहे. चबुतऱ्याचे काही काम बाकी असल्यामुळे १० फेब्रुवारी रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे. मात्र उद्घाटनाला काहीच दिवस शिल्लक असतांना आता उद्घाटन कोणाच्या हस्ते करावे यावरूनच वाद सुरू झालेला आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी त्याचे उद्घाटन हे छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशजांच्या हस्ते व्हावे अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेला मराठा क्रांती मोर्चाने देखील पाठिंबा दर्शवला आहे.
मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाला मात्र विरोध दर्शवला आहे. तर या सगळ्यामध्ये भाजपने आता वेगळीच भूमिका घेतली आहे. १० फेब्रुवारीचे उद्घाटन १९ फेब्रुवारी रोजी केले जावे. असे म्हणत १० तारखेला उद्घाटन झाल्यास आमचा या कार्यक्रमास विरोध असेल अशी भूमिका घेतली आहे. तर औरंगाबाद महापालिकेने १० फेब्रुवारीलाच उद्घाटन करण्याचे नियोजन केलेले आहे. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच हे उद्घाटन व्हावे. अशी महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांची इच्छा असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता नेमके उद्घाटन कधी होणार? आणि कोणाच्या हस्ते होणार ? यावरून येणाऱ्या काळात आणखी वाद उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महत्वाच्या बातम्या:
श्रीक्षेत्र मुर्डेश्वर संस्थानाला ‘अ’ दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आराखडा तयार करा-अब्दुल सत्तार
औरंगाबादचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे का? हुजरेगिरीविरोधात भाजप करणार आंदोलन..!
“माझ्या ब्राचं माप देव घेतोय”; वादग्रस्त वक्तव्यानंतर श्वेता तिवारीने मागितली माफी
“रोहितला तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार बनवणे रिस्की आहे..”; सबा करीम यांचा दावा