अल्लाहमुळे मी कोरोनाला हरवू शकलो, पाकिस्तानी क्रिकेटरचा दावा

Pakistani cricket Team

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक खेळाडू या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. पाकिस्तानचा माजी सलामीवीर तौफीक उमर हा देखील कोरोनाच्या विषाणूच्या विळख्यात अडकला होता. अल्लाहमुळे मी करोनाचा पराभव करू शकलो असं त्याने म्हटलं आहे.

हार्दिक पंड्या बाप होणार हे पाहून नताशाचा एक्स बॉयफ्रेंड म्हणाला…

त्यानं सांगितले की,दोन आठवड्याच्या आयसोलेशन नंतर माझा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अल्लाहमुळे मी तंदुरुस्त झालो आहे. या संकटकाळात प्रत्येकानं स्वतःची काळजी घ्यायला हवी. आपल्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाय आणि योग्य पाऊलं उचलायला हवी.

विधानपरिषद निवडणूक : यावेळेस तरी माळी समाजाला प्रतिनिधित्व मिळणार का ?

उमरला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर तो 14 दिवसांसाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये गेला होता आणि त्यानंतर आलेला त्याचा वैद्यकिय अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोनावर मात केल्यानंतर उमरनं लोकांना स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.38 वर्षीय खेळाडूनं कोरोनाची लागण झाल्याचे समजताच योग्य ती काळजी घेतली त्यामुळे तो आता बरा झाला आहे.