‘माझी पेंटिग्स खरेदी करा,माझ्या किडण्या मी पुढील वीजबिलासाठी राखून ठेवत आहे’

arshad warsi

मुंबई : एकीकडे लॉकडाउनमुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले असताना अवाच्या सवा दराने वीज बिल येत असल्याने महावितरणविरोधात राज्यभरात संताप आहे. वाढीव वीज बिलाचा फटका फक्त सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रेटींनाही बसत असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री तापसी पन्नू आणि रेणुका शहाणे यांच्या पाठोपाठ आता आणखी एका कलाकाराला वीज बिलाचा फटका बसला आहे.

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी यालाही वीज बिलामुळे शॉक बसला आहे. लाखभर रुपयाचे वीज बिल आल्याचे सांगत अर्शदने अदानी ग्रुपवर आगपाखड केली आहे. ‘हायवे लुटारु ‘अदानी’कडून आलेले हे माझे वीज बिल. ज्याला आमचे बिल बघून चांगलेच हसू येत आहे. 1,03,564.00 रुपये तुमच्या खात्यातून 5 जुलै 2020 रोजी डेबिट केले’ असे ट्वीट अर्शदने केले आहे. त्यासोबत अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा खळाळून हसतानाचा फोटो अर्शदने शेअर केला आहे.

वीजबिला बाबत एका वृत्तपत्राशी बोलताना त्याने आपले अनुभव शेअर केले. त्याने चाहत्यांना पेंटिग्स विकत घेण्याची मागणी केली आहे. मला अदानीचं विजेचं बिल भरण्यासाठी पैशांची गरज असल्याने माझी पेंटिग्स खरेदी करा असं त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. माझ्या किडण्या मी पुढील बिलासाठी राखून ठेवत असल्याचेही त्याने या ट्विटमध्ये म्हणले आहे.

अर्शद शिवाय अभिनेत्री हुमा कुरैशीला पण वाढीव वीज बिलाचा फटका बसला आहे. नुकताच हुमाने ट्विट करत वीज बिलाची माहिती दिली आहे. ‘गेल्या महिन्यात मी मला सहा हजार रुपये वीज बिल भरले आणि आता या महिन्यात मला ५० हजार रुपये बिल?’ असे हुमाने ट्विटमध्ये म्हटले आहे. हुमाने पण अदानी वीज कंपनीला टॅगही केलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने देखील वीजबिलाचा 36 हजारांचा आकडा पाहून संताप व्यक्त केला होता. तापसीने आपल्या ट्विटमध्ये आधीच्या महिन्यांच्या वीज बिलाचे फोटोही जोडून भरमसाट वीज बिल आलं असल्याचं सांगितलं आहे.

अभिनेत्री हुमा कुरैशीला पण वीज बिलाचा झटका

वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी राज्य सरकार केंद्राला निधीची मागणी करणार – नितीन राऊत

भारताला मोठं यश ! १५ ऑगस्टला येणार ‘मेड इन इंडिया’ कोरोना लस