जिल्हाधिकाऱ्याची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

प्रशासकीय क्षेत्रात खळबळ

बिहारमधील बक्सर जिह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.रेल्वेखाली उडी घेऊन मुकेश पांडे यांनी आत्महत्या केल्याने देशभरातील प्रशासकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मुकेश पांडे हे पाटण्यावरून बुधवारी रात्री दिल्लीत आले होते .मामाला हार्ट अटॅक आल्यामुळे दिल्लीला जात असल्याचं त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले होते. मुकेश पांडे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही.त्यांच्या जवळ जी सुसाईड नोट सापडली आहे त्यावरून देखील त्यांच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेले नाही.

पांडे यांच्याजवळ मिळालेल्या सुसाईड नोट मध्ये काय म्हटलं आहे?

मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे.माझ्या मृत्यूनंतर माझ्या आत्महत्येची माहिती माझ्या नातेवाईकांना द्या. मी दिल्लीतील लीला पॅलेस हॉटेलमधील 742 नंबरची खोली घेतली आहे. तिथे माझ्या बॅगेत सुसाईड नोट आहे, त्यामध्ये पूर्ण माहिती दिली आहे. सुसाईड नोटमध्ये चार फोन नंबर देण्यात आले आहेत. ते त्यांच्या नातेवाईकांचे नंबर आहेत.सध्या पोलिसांनी बॅगेतील सुसाईड नोटबाबत माहिती दिलेली नाही.