मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी लोकवर्गणीतून गोळा केलेले पैसे हडप केल्याचा आरोप केला. त्यावर पोलिसांनी सोमय्या पिता पुत्रांना चौकशीसाठी बोलावले असता सोमय्या हे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दिल्लीला गेले असल्याची माहिती त्यांच्या वकीलांनी दिली.
त्यावरून सोमय्या हे फार झाले असल्याचा आरोप राऊतांनी केला होता. त्यानंतर आता पुन्हा राऊतांनी सोमय्यांना याच मुद्द्यावरून घेरले आहे. कायद्यापासून पळून न जाण्याची प्रेरणा सोमय्या यांनी लोकांना दिली आहे आणि आता तेच स्वतःच पळत आहेत, त्यामुळे त्यांनी पळू नये आवाहन मी त्यांना करतो, कारण गुन्हेगाराने कायद्याचं पालन केलं पाहिजे, असे राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –