fbpx

प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करू पण एमआयएम नको – अशोक चव्हाण

अशोक चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा: राज्य आणि केंद्रातील भाजपला सत्तेतून उतरवण्यासाठी काँग्रेसकडून मित्रपक्षांची जुळवणी केली जात आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या भारिपला महाआघाडीत घेण्यासाठी बोलणी सुरू आहेत. मात्र, आंबेडकर यांनी आघाडी केलेल्या एमआयएएमला सोबत घेणार नसल्याचं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र काँग्रेसकडून सध्या भाजप सरकार विरोधात जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने चव्हाण यांच्यासह अनेक कॉंग्रेसनेते अमरावतीमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चव्हाण म्हणाले की, मध्यप्रदेश आणि राजस्थान विधानसभा निकालानंतर आघाडीचे चित्र स्पष्ट होईल. सध्या काँग्रेस – राष्ट्रवादीची बोलणी अंतिम टप्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुकीमध्ये बहुमत मिळवण्यासाठी समविचारी पक्षांनासोबत घेण्याची भूमिका काँग्रेस आणि भाजपने देखील घेतली आहे. दुसरीकडे राज्यामध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या बहुजन आघाडीला सोबत घेण्याच्या हालचाली काँग्रेसकडून होत आहेत. मात्र एमआयएम अडचणीचा विषय होणार असल्याने त्यांना आघाडीत घेण्यास काँग्रेस नेत्यांकडून लाल सिग्नल देण्यात येत आहे.

1 Comment

Click here to post a comment