‘पण मला ‘या’ प्रश्नाचे उत्तर हवंय’ ; जुही चावला कडाडल्या

juhi chawla

मुंबई : भारतात 5G टेक्नॉलॉजी आणण्याची तयारी सुरु झाली आहे. त्याअंतर्गत बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने थेट भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मोबाईल टॉवरमधून निघणा-या हानीकारक रेडिएशनविरोधात जुही गेल्या अनेक वर्षांपासून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान आता या प्रकरणी अभिनेत्री जुही चावलाला 20 लाखांचा दंड झाला आहे. कायद्याचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत तिला हा दंड दिल्ली हायकोर्टाकडून करण्यात आला आहे. कोर्टाच्या ऑनलाईन सुनावणीची लिंक जुहीने सोशल मीडियात टाकल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. केवळ प्रसिद्धीसाठी तिने ही याचिका दाखल केल्याचं कोर्टाने म्हटले आहे. जुहीने ही याचिका नोंदवल्यानंतर असे म्हटले जात होते की, ती 5G विरूद्ध आहे आणि त्यावर बंदी आणावी, अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, आत अभिनेत्रीने हे स्पष्ट केले आहे की, ती 5G तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही.

आपला अजेंडा 5G वर बंदी घालण्याचा नसल्याचे जुहीने स्पष्ट केले आहे. त्या म्हणाल्या की, लोकांचा गैरसमज आहे की, आम्ही 5G तंत्रज्ञानाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आम्हाला हे सर्वांना स्पष्ट करून सांगायचे आहे की, आम्ही 5G तंत्रज्ञानाविरूद्ध नाही. तथापि, आम्ही केवळ सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना अपील केले की, 5G तंत्रज्ञान सर्व मानवजातीसाठी, पुरुष, स्त्रिया, मुले, वृद्ध लोक, प्राणी सुरक्षित आहे का?, याचे उत्तर द्या.’ असे स्पष्ट मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे.

जूही चावला म्हणाल्या की, ‘या 5G योजनांमुळे मानवांवर गंभीर, अपरिवर्तनीय परिणाम होतो आणि पृथ्वीवरील पर्यावरणाचे कायमचे नुकसान होण्याचा धोका आहे. अ‍ॅडव्होकेट दीपक खोसला यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची विनंती केली आहे की, 5G तंत्रज्ञान मानवजातीसाठी, पुरुष, स्त्री, प्रौढ, लहान मुलं, अर्भक, प्राणी आणि सर्व प्रकारच्या जीव-जंतुंसाठी सुरक्षित आहे का हे स्पष्ट करावं’ असे देखील त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

IMP