पण मी दलितांच्या घरी जाऊन जेवणार नाही – उमा भारती

Uma Bharati

टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी नुकतंच दलितांवरून एक वादग्रस्त विधान केलं आहे. ‘दलितांच्या घरी जाऊन जेवण करण्यासाठी मी प्रभु श्रीराम नाही’ अस वादग्रस्त विधान उमा भारती यांनी केले आहे.

काय म्हणाल्या उमा भारती ?

उमा भारती म्हणाल्या, मी सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या भोजन समारंभांमध्ये सहभागी होत नाही. दलितांच्या घरी जाऊन जेवण करण्यासाठी मी प्रभु श्रीराम नाही, दलितांच्या घरी जाऊन जेवण करण्यापेक्षा मी त्यांना माझ्या घरी भोजनासाठी बोलवेन, पण मी दलितांच्या घरी जाऊन जेवणार नाही.

‘त्यांच्या घरी जाऊन जेवायला मी काही प्रभू रामचंद्र नव्हे. मी घरी जेवायला गेल्याने ते पवित्र होणार नाहीत. किंबहुना दलित लोक जेव्हा आपल्या घरात येऊन जेवतील तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने पवित्र होऊ.’ ‘जेव्हा दलितांना मी माझ्या हाताने जेवायला वाढेण आणि माझ्यासह माझे कुटुंबिय त्यांची उष्ठी ताट उचलतीत तेव्हा खऱ्या अर्थाने मी धन्य होईल.’

2 Comments

Click here to post a comment