..तरीही धनजंय मुंडे यांचा जलवा कायम

dhananjay munde

बीड : अत्याचाराचा आरोप झाल्याने संकटात आलेल्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ग्रामपंचायत निवडणुकीत दिलासा मिळाला आहे. त्यांचे होम ग्राऊंड असलेल्या परळीत विजय प्राप्त केला आहे. भाजपला पराभवाची धुळ चारत परळी तालुक्यातील ८ पैकी ६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे राज्यात काहीही चर्चा सुरू असली, तरी होम ग्राऊंडमध्ये काहीच फरक पडला नसल्याचे सिद्ध झाले आहे.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर होणाऱ्या आरोपानंतर परळी ग्रामपचांयतीवर काय परिणाम होतो याकडं सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र, पुन्हा एकदा परळीकरांनी धनंजय मुंडे यांच्यावर विश्वास दाखवला असून परळीत ६ जागांवर धनंजय मुंडे यांच्या गटानं दणदणीत विजय मिळवला आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या कथित बलात्काराच्या आरोपांमुळं या सगळ्याचा परिणाम निवडणुकांवर होणार का, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु, धनंजय मुंडे यांना आपला गड राखण्यात यश आलं आहे. परळीतील एकूण ८ ग्रामपंचायतींपैकी ६ ग्रामपचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता राखली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा विजय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीने विजय मिळवलेल्या ग्रामपंचायती
वंजारवाडी (बिनविरोध), रेवली (बिनविरोध), सरफराजपुर, मोहा, लाडझरी, गडदेवाडी

महत्वाच्या बातम्या