मुलींच्या जन्माच स्वागत करण्यासाठी ‘लेक समृद्धी’ योजना राबवणारा उद्योगपती

businessman rejendra survase implementing the 'Lake Samrudhi' scheme to welcome the birth of girls

महाराष्ट्र देशा स्पेशल : 21 व्या शतकात मुलगा – मुलगी हा भेदभाव कमी झाला आहे. मात्र, स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी आजही जन्माला येणाऱ्या मुलीचे व मुलाचे स्वागत शहरी आणि ग्रामीण भागांत वेगवेगळ्या पद्धतीने केल जात हे नाकारता येणार नाही.  हि परिस्थिती बदलण्यासाठी आज ग्रामीण भागात अनेक लोक पुढाकार घेत असल्याच दिसून येत आहे. आज आपण पहाणार आहोत अशा एका उद्योजकाची कहाणी ज्यांनी पुण्यासारख्या मेट्रो शहरात राहून देखील आपल्या गावातील मुलींच्या जन्माच्या स्वागतासाठी खास योजना सुरु केली आहे.

rajendra survase lek samrudhi scheme

राजेंद्र सुरवसे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये असणाऱ्या सौंदरे या जेमतेम २५०० ते ३००० हजार लोकसंख्या असणाऱ्या गावचे रहिवासी. कामाच्या शोधात १९८७ -८८ च्या दरम्यान ते पुण्याला आले. पुढे मेहनतीच्या जोरावर त्यांनी स्वतची ट्रान्सपोर्ट कंपनी सुरु केली. आज सुरवसे यांच्या कंपनीचा आवाका महाराष्ट्रभर आहे. उद्योगामध्ये प्रगती करत असताना राजेंद्र सुरवसे यांनी ‘समर्थ प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेची स्थापना करत सौंदरे या आपल्या मुळगावी मुलींच्या जन्माच स्वागत करण्यासाठी ‘लेक समृद्धी’ हियोजना सुरु केली आहे, या योजनेमध्ये मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर बँकेमध्ये पाच हजार रुपयांची दीर्घ मुदतीची  ठेव ठेवली जाते. या योजने माघील उद्देश हा  मुलगी मोठी झाल्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी तिच्या उच्च शिक्षणासाठी पैस्यांची मदत व्हावी हा आहे. हि योजना राबवत असताना दुसरीकडे गावातील मुलींच्या लग्नाचा थोडासा भार उचलण्यासाठी ‘लेक पाठवणी’ हि खास योजना राबवली जात आहे. यामध्ये मुलीच्या लग्नामध्ये तिच्या माता – पित्यांना रोख अकरा हजार रुपयांची ‘फुल नाही तर किमान फुलाची पाकळी’ म्हणून मदत केली जाते . गेल्या वर्षभरात १५ मुलींच्या लग्नामध्ये हि मदत करण्यात आली आहे.

rajendra survase

सुरवसे यांच्या वतीने माघील २० वर्षापासून गावामधील हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक बक्षिसे देण्यात येतात. यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत  प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यासाठी रोख स्वरुपात तसेच भेटवस्तूच्या माध्यमातून बक्षीसे दिली जात आहेत. गावामध्ये आजही इंग्लिश विषय म्हणल कि विद्यार्थी थोडे माघे पडतात. मात्र अस्यातही चांगला अभ्यास करून इयत्ता सातवीमध्ये इंग्लिश विषयात प्रथम येणाऱ्याला मनगटी घड्याळ दिल जात.  दहावीमध्ये ९० टक्यांच्या वर गुण घेवून उत्तीर्ण होणाऱ्या गावातील विद्यार्थ्यास लॅपटॅाप. तर ८५ ते ९० टक्यांच्या दरम्यानच्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन बक्षीस टॅब म्हणून दिला जातो.

‘आपण कितीही प्रगती केली rajendra survaseतरी आपल्या जन्मभूमीच देन लागतो ह्याच भावनेतून आज मी समर्थ प्रतिष्ठान मार्फत गावामध्ये सामाजिक कार्य करत आहे. ग्रामीण भागामध्ये कुटुंबाकडून मुलीच्या बाबत आज हि थोड्या प्रमाणात कानाडोळा केला जातो. मात्र मुलांना हव ते पुरवल जात . हीच परिस्थिती बदलण्यासाठी मुलींच्या जन्माच स्वागत करण्यासाठी हि योजना सुरु केली आहे’ – राजेंद्र सुरवसे .उद्योगपती