#corona : पुण्यातील आयटी कंपन्या सुरु होणार, उद्योग विभागाने दिली परवानगी

पुणे IT

पुणे : कोरोनामुळे अनेक आयटी कंपन्या या गेले 2 महिने बंद आहेत. तर या सर्व आयटी कंपन्यांचे काम घरून सुरु आहे. मात्र आता पुणे शहरातील कंटोन्मेंंट झोन वगळता इतर भागातील आयटी कंपन्या सुरु करण्यास उद्योग विभागाने परवानगी दिली आहे.

उद्योग विभागाने दिलेल्या परवानगी नुसार, काही अटी आणि शर्तीनुसार सोशल डिस्टन्सचे पालन करत कंपन्या सुरु करण्याची परवानगी आहे. पुणे शहरात साडे चारशे मोठे आणि 1400 लहान आयटी उद्योग आहेत. तर 72 आयटी पार्क असून या कंपन्यांमध्ये साडेचार लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळे कार्यालयात काम करताना एकमेकांना स्पर्श होण्याचा धोका असल्याने आयटी कंपन्यांमध्ये सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे लागणार आहे.

दरम्यान पुण्याच्या उपनगरांमध्ये आयटी इंडस्ट्रीचा मोठ्या प्रमाणत विकास झाला आहे. मगरपट्टा, नगर रस्ता, सोलापूर रस्ता, कोथरूड, चांदणी चौक, नांदेड सिटी, रामवाडी परिसर, डेक्कन, नळस्टॉप, पाषाण, बाणेरसह इतर विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणत आयटी कंपन्या आहेत.

पुणेकरांनो सावधान ! कोरोना वाढतोय

राज्यातील कोरोनाचाबाधितांचा आकडा आता 41642 वर गेला आहे. तर त्यातील सर्वाधिक म्हणजे 27251 रुग्ण हे एकट्या मुंबईतून आहेत. तसेच पुण्यात देखील कोरोनाबाधितांचा आकडा हा 5 हजारच्या वर गेला आहे. तर शुक्रवारी एका दिवसात पुण्यात सर्वाधिक 358 नवे कोरोनाबधित रुग्ण आढळले आहेत.

पुण्यातील रुग्णांचा आकडा आता 5167 वर गेला असल्याने चिंता वाढली आहे. पुणे शहरात काल तब्बल 291 कोरोना रूग्णांची वाढ झाली असून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. परिणामी कोरोना बळींची संख्या 257 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 2552 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा प्रश्न लवकर निकाली काढा; राज्यपालांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

#Amfan : हवाई पाहणीनंतर बंगालला १००० कोटींची मदत तर ओडिशाला ५०० कोटींचे अर्थसाह्य : मोदी