परभणीतून अमरावतीला जाणाऱ्या बस बंद; जिल्ह्यात सोमवारी २२ नव्या रुग्णांची भर

परभणी : परभणी विभागातील सात आगारांमधून सोडल्या जाणाऱ्या बसेसमध्ये मास्क असल्याशिवाय प्रवाशांना प्रवेश देऊ नका. तसेच अकोला, अमरावती, बुलडाणा या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने या मार्गावर सोडल्या जाणाऱ्या बसेस बंद करण्याच्या सूचना विभागीय अधिकारी कार्यालयाने दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय बसेस सॅनेटाइझ करूनच सोडण्याचेही कळवण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्या परभणी विभागांतर्गत परभणी, जिंतूर, पाथरी, गंगाखेड, हिंगोली, कळमनुरी व वसमत हे सात आगार आहेत. या आगारातून दररोज शहरी भागासोबतच ग्रामीण भागात सुमारे ४०० पेक्षा अधिक बसगाड्या सोडल्या जातात. यामध्ये काही लांब पल्ल्याच्या बसगाड्यांचाही समावेश केलेला आहे.

परभणीत सोमवारी २२ नव्या रुग्णांची भर
परभणी जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाच्या संसर्गात वाढ झाली आहे. सोमावारी २२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे आता जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १८६ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने कोरोनाच्या चाचण्या वाढवल्या आहे. सोमावारी एकून ५८४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८,२९० वर
परभणी जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८ हजार २९० वर पोहोचली आहे. यापैकी ७ हजार ७८३ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. तर जिल्ह्यात कोरोनामुळे ३२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाभरात सध्या १८६ रुग्णांवर उपचार सुरू आहे. यातील ५४ रुग्णांवर आयटीआय हॉस्पीटलमध्ये, ५४ रुग्ण खासगी रुग्णालयात तर ७९ रुग्णांवर होम आयोसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.

महत्वाच्या बातम्या