पुण्यातून मुंबई, सोलापूरकडे जाणाऱ्या बस बंद

पुणे : राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलन तीव्र झाले आहे, आज मुंबईमध्ये बंद पुकारण्यात आला आहे, या दरम्यान अनेक ठिकाणी संवेदनशील परिस्थिती निर्माण झाल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बस बंद करण्यात आल्या आहेत. तसेच पुणे – सोलापूर हायवेवरील एसटी वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे.

मराठा क्रांती मोर्चा : राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा रद्द

मुंबईमधील बंदच्यावेळी लोकल रेल्वे गाड्या अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आला, तर अनेक ठिकाणी टायर पेटवून देण्यात आले आहेत. दरम्यान,कळंबोली जवळ पोलिसाकडून हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही सर्व परिस्थिती पाहता पुणे ते मुंबई जाणाऱ्या बस स्वारगेट तसेच शिवाजीनगर स्थानकातून सोडणे बंद करण्यात आलं आहे.

दुसरीकडे, पुणे सोलापूर महामार्गावर दौंडनजीक बस अडवण्याची घटना झाल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक देखील बंद करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी कारवाई केल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत.

मराठा क्रांती ठोक मोर्चा : जेऊर १००% बंद

You might also like
Comments
Loading...