fbpx

‘त्या’ अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाखाच्या मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

दापोली : दापोली येथून महाबळेश्वरला निघालेल्या मिनीबसला आंबेनळी घाटात भीषण अपघात झाल्याची दुर्देवी घटना काल घडली होती . या दुर्घटनेत बसमधील ३३ प्रवाशांपैकी ३२ जणांचा जागीच मृत्यू झालाय. दरम्यान राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ४ लाखाची मदत करणार असल्याचे जाहीर केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली.

महाबळेश्वरला पर्यटनासाठी निघालेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची मिनी बस प्रतापगड घाटात शनिवारी सकाळी कोसळली. प्राथमिक माहितीनुसार या बसमध्ये ३३ प्रवाशी होते. या बस अपघातात ३२ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून, पाऊस व धुक्यामुळे मदत कार्याला अडथळा येत आहे. दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्वर येथे फिरायला निघाले होते.

दापोली विद्यापीठ येथील ३० पेक्षा अधिक कर्मचारी महाबळेश्वर येथे विद्यापीठच्या बसने सहलीला निघाले होते. त्यावेळी पोलादपूर पासून 15 किमी अंतरावर आंबेनळी दरीत बस कोसळली. या दुर्घटनेत बसमधील ३2 प्रवाश्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. केवळ एकच जन या दुर्घटनेतून बचावला . पोलादपूर पोलिस स्टेशन येथील संपूर्ण स्टाफ, महसूल विभाग, तसेच महाबळेश्वर येथील बचाव पथक आणि वैद्यकीय पथक यांच्याकडून आज दुसऱ्या दिवशी मदतकार्य सुरु आहे.

पोलादपूर घाट दुर्घटना : कृषी राज्यमंत्र्यांची घटनास्थळी धाव