आंबेनळी दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी – मोदी

नवी दिल्ली : सहलीसाठी महाबळेश्वरला निघालेल्या दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस काल आंबेनळी घाटात तब्बल आठशे फूट खोल दरीत कोसळली यात 3२ जणांचा जागीच मृत्यू झाला. आतापर्यंत 25 जणांचे मृतदेह बचाव पथकाने बाहेर काढले आहेत. घटनास्थळी ट्रेकर्स आणि एनडीआरएफकडून दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केलं आहे. रायगडमधल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचं मला दुःख आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. महाबळेश्वरमध्ये झालेल्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तीव्र दुःख झालं आहे. प्रशासनाला तात्काळ बचावकार्य राबवण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ अधिकारी आणि आपत्कालीन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.Loading…
Loading...