आंबेनळी घाटात बसला भीषण अपघात, ३३ पैंकी ३२ जणांचा जागीच मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा :  महाबळेश्वरला पर्यटनासाठी निघालेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची  मिनी बस प्रतापगड घाटात शनिवारी सकाळी कोसळली. प्राथमिक माहितीनुसार या बसमध्ये ३३ प्रवाशी होते.  या बस अपघातात ३२ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून,  पाऊस व धुक्यामुळे मदत कार्याला अडथळा येत आहे. दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्वर येथे फिरायला निघाले होते.

दापोली विद्यापीठ येथील ३० पेक्षा अधिक कर्मचारी महाबळेश्वर येथे विद्यापीठच्या बसने सहलीला निघाले होते. त्यावेळी पोलादपूर पासून 15 किमी अंतरावर आंबेनळी दरीत बस कोसळली. या दुर्घटनेत बसमधील ३2  प्रवाश्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. केवळ एकच जन या दुर्घटनेतून बचावला असल्याची माहिती समोर येत आहे. पोलादपूर पोलिस स्टेशन येथील संपूर्ण स्टाफ, महसूल विभाग, तसेच महाबळेश्वर येथील बचाव पथक आणि वैद्यकीय पथक हजर झाले आहे. ही बस दापोली येथील असल्याचे समजते.

करुणानिधींची प्रकृती चिंताजनक, समर्थकांची रुग्णालयाबाहेर गर्दी

घटनेत बदल करुन मराठा समाजाला आरक्षण द्या : शरद पवार