मुंबई: मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील घागरगाव येथे ४० प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याने आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आलं असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठी घोषणा केली आहे.
मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये- एकनाथ शिंदे
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत.
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 18, 2022
दरम्यान खलघाट येथील संजय सेतू येथे हा अपघात झाला. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेला दुजोरा दिला. या घटनेनंतर विभागीय आयुक्त डॉ. पवनकुमार शर्मा यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. या बसमध्ये इंदौर आणि पुण्याचे प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ही बस महाराष्ट्र रोडवेजची असल्याचे खासदार गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.
जळगाव प्रशासन खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात-
दरम्यान घटनास्थळी खरगोन व धारचे जिल्हा प्रशासन पोहोचले असुन बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश आले आहे. तसेच जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या हेतुने जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात असून अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IND vs ENG : ऋषभ पंतच्या धडाकेबाज कामगिरीमागे ‘हा’ खेळाडू, ट्विटने केला खुलासा; वाचा!
- Bus accident in Indore : इंदौरहून जळगावला येणारी बस नर्मदा नदीत कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू
- Manmohan singh | मनमोहन सिंग यांना पाहून नेटकरी भावुक; मतदानासाठी आले व्हीलचेअरवरुन
- Sanjay Raut : “सिढिया चढते हुए जो उतरना भूल जाते है…”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत
- Sanjay Raut | राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापूर्वी राऊत भावूक! म्हणाले, “मला पॉइंटेड केलं जातंय”
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<