बस अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली

औरंगाबाद : सातत्याने एसटीच्या ब्रेक फेल होण्याच्या घटनात दिवसेंदिवस वाढ असताना आज सकाळीही एका बसचे ब्रेक हर्सूल टी पॉईंट जवळ फेल होऊन अपघात झाला.  मध्यवर्ती बसस्थानक आगाराची बस (क्रमांक एम. एच. २०- बी. एल. २२५२) रायपूरहून औरंगाबादला येत होती.  बसचे ब्रेक फेल झाल्याने ती रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन धडकली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. बस मध्ये सुमारे 54 प्रवासी होते बसमध्ये काही शाळकरी विद्यार्थी देखील होते, घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण शोधले जाईल, असे आगार प्रमुख स्वप्निल धनाड यांनी सांगितले आहे

You might also like
Comments
Loading...