खारेपाटणमध्ये खासगी बस उलटून २६ जण जखमी

accident

टीम महाराष्ट्र देशा – मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण (ता. कणकवली) येथे आज पहाटे खासगी आरामबस उलटल्याने झालेल्या अपघातात २६ प्रवासी जखमी झाले. विशाल ट्रॅव्हल्सही ही बस आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खारेपाटणमधील संभाजीनगर भागात आली असता चालकाचा ताबा सुटल्याने बसचा अपघात झाला. खारेपाटणमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला. काल सकाळी रामेश्वर ट्रॅव्हल्सच्या आरामगाडीला झालेल्या अपघातात १२ जण जखमी झाले होते. काल सायंकाळी परळ (मुंबई) येथून विशाल ट्रॅव्हल्सची बस बांदा (ता. सावंतवाडी) येथे निघाली होती. तिला आज सकाळी अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना खारेपाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यातील ७ गंभीर प्रवाशांना कणकवलीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले