टीम इंडियात बुमराहची एन्ट्री लांबणीवर, बीसीसीआयने दिले ‘हे’ कारण

blank

टीम महाराष्ट्र देशा : भारताचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे गेले अनेक दिवस टीमच्या बाहेर आहे. त्यामुळे चाहते जसप्रीत बुमराहची वाट पाहत आहेत. मात्र याचं चाहत्यांसाठी एक दुःखाची बातमी आहे. कारण टीमच्या बाहेर असलेला जसप्रीत बुमराह याला पुन्हा टीममध्ये येण्यासाठी जानेवारी महिना उजाडणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जसप्रीत बुमराहला पाठीची दुखापत झाली होती आणि तेव्हापासून बीसीसीआयचा वैद्यकीय पथक त्याला पूर्णपणे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. बुमराह अखेरचा सामना वेस्ट इंडीज विरुद्ध खेळला होता आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती. बुमराह त्यावेळी टीममध्ये होता, परंतू मालिका सुरू होण्याच्या एक आठवड्यांपूर्वी बुमराहला दुखापत झाल्याने बीसीसीआयने त्याला अनफिट घोषित केले होते.

दरम्यान टीम इंडिया जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामने खेळणार आहे. त्यामुळे बुमराह या मालिकेत पूर्ण तंदुरुस्त खेळेल अशी अपेक्षा आहे. म्हणजेच बुमराह पुढच्या श्रीलंका आणि विंडीज विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या आगामी मालिकेत खेळणार नसल्याचं स्पष्ट झाले आहे.

महत्वाच्या बातम्या