ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यात चांगल्या फॉर्मात असणाऱ्या बुमराह विश्रांती

टीम महाराष्ट्र देशा- सध्या चांगल्या फॉर्मात असणारा टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत, तसंच त्यानंतरच्या न्यूझीलंड दौऱ्यात विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहच्या जागी मोहम्मद सिराज याची वर्णी लावण्यात आली आहे. मोहम्मद सिराजला वन डे आणि सिद्धार्थ कौलला ट्वेंटी-20 संघात स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान, भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत केले. या मालिकेत बुमराने सर्वाधिक 21 विकेट घेतल्या आहेत. मे महिन्यापासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देण्याचा विचार बीसीसीआय करत होते. मात्र, ही विश्रांती गोलंदाजांना आयपीएलदरम्यान मिळणार होती आणि त्यामुळेच बीसीसीआयचा हा निर्णय आयपीएल मालकांच्या दबावातून घेतल्याची चर्चा नेटिझन्सनी सुरु केली आहे.

You might also like
Comments
Loading...