टीम महाराष्ट्र देशा: बँक परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) विविध पदांची भरती प्रक्रिया राबवत आहे. या भरती प्रक्रियेद्वारे बँक ऑफ बडोदा, बँक परीक्षेची तयारी करत असणाऱ्या इच्छुकांना मोठी नोकरी संधी उपलब्ध करून देत आहे. या भरती प्रक्रियेमध्ये बँक ऑफ बडोदा आस्थापनेवरील विविध व्यावसायिक पदांच्या एकूण 58 रिक्त जागा भरण्यासाठी बँकेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी पदांनुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
Bank of Baroda मध्ये विविध पदांच्या एकूण 58 जागा
बँकेची परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी बँक ऑफ बडोदा विविध पदांच्या एकूण 58 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहे. यामध्ये वरिष्ठ गुणवत्ता आश्वासन लीड, गुणवत्ता आश्वासन अभियंता, कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अभियंता, वरिष्ठ विकासक – फुल स्टॅक जावा, विकासक- फुल स्टॅक जावा, विकासक – पूर्ण स्टॅक .NET & JAVA, वरिष्ठ विकासक – मोबाइल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, डेव्हलपर – मोबाईल अनुप्रयोग विकास, वरिष्ठ UI/UX डिझायनर, UI/UX डिझायनर इत्यादी पदांच्या रिक्त जागा आहे.
शैक्षणिक पात्रता
बँक ऑफ बडोदा मधील या पदांसाठी इच्छुक उमेदवार संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान शाखेतून B.E/B.Tech पदवी उत्तीर्ण केलेला असावा. तंत्रज्ञान पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्राबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
बँक ऑफ बडोदा यांच्या मार्फत विविध पदांसाठी पदानुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार 9 नोव्हेंबर 2022 पर्यंत या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.
महत्वाच्या बातम्या
- Dhanajay Munde | दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात पंकजा मुंडेंना मिळणार संधी?, भाऊ धनंजय मुंडे म्हणाले…
- SBI Recruitment | SBI मध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Rajan Salvi । नितेश राणेंच्या दाव्याला राजन साळवींचे त्याच शब्दात प्रत्युत्तर! म्हणाले, “ये अंदर की बात है…”
- TVS Bike Launch | TVS ने केली आपली ‘ही’ बाईक लाँच
- Rohit Pawar | रोहित पवार येणार अडचणीत?, साखर आयुक्तांसहित बारामती ॲग्रो लिमीटेडची होणार उच्चस्तरीय चौकशी