भारतीय रिझर्व्ह बँकेत अनेक पदांसाठी बंपर भरती

टीम महाराष्ट्र देशा : रिझर्व्ह बँकेत कायदेशीर अधिकारी, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि अन्य पदे रिक्त असून. प्रत्येक पोस्टसाठी विविध शैक्षणिक पात्रता निश्चित केल्या गेल्या आहेत. आरबीआयमध्ये शासकीय नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली सुवर्ण संधी चालून आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने अनेक पदांसाठी बंपर भरती सुरु केली आहे. केवळ पदवीधर उमेदवार या पोस्टसाठी अर्ज करु शकतात. अर्ज प्रक्रिया गेल्या महिन्यापासून सुरु आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ ऑगस्ट आहे. या जागांसाठी पदवीसह एलएलबी, बी.ई. आणि बी. टेक झालेले नोकरीसाठी अर्ज करु शकतात. प्रत्येक रिक्त जागेसाठी विविध शैक्षणिक पात्रता निश्चित केल्या आहेत.

ही पदे भरली जाणार आहेत.

व्यवस्थापक तांत्रिक सिव्हिल – ५ जागा.
सहाय्यक व्यवस्थापक (राज्यभाषा) – ८ जागा.
लीगल अधिकारी ग्रेड बी – ९ जागा.
सहाय्यक व्यवस्थापक (प्रोटोकॉल आणि सुरक्षा) – ४ जागा.
एकून रिक्त पदांची संख्या  ३०.

निवड प्रक्रिया अशी होईल :
उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारावर होईल. यानंतर निवडलेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत होईल. त्यांच्या प्रदर्शनानंतर त्या आधारावरच त्यांना नोकरी ऑफर मिळेल.

रिझर्व्ह बँकेच्या ऑफिशिअल वेबसाईट rbi.org.in वर अधिक माहिती दिलेली आहे.

आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मायावती यांची मागणी

‘गुगल फॉर जॉब्स’ नोकरी शोधणाऱ्यांसाठी गुगलची सेवा