काश्मीरची समस्या सोडविण्यासाठी काश्मिरींना विश्वासात घ्यायला हवे- पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: काश्मीरची समस्या ‘गोळी’ने संपणार नाही. काश्मिरी नागरिकांना विश्वासात घेतल्याखेरीज, त्यांना त्यांच्याप्रति बंधुभाव दाखविल्याखेरीज या प्रश्नावर तोडगा निघणार नाही,असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर झालेल्या समारंभात राष्ट्राला उद्देशून भाषण करतांना पंतप्रधान म्हणाले की, काश्मिरी नागरिकांना शिवीगाळ करुन हा प्रश्न सुटणार नाही, त्यांच्याबद्दल सर्वांगीण विश्वास दाखवायला हवा.काश्मिरी लोकांना प्रेम दिल्याखेरीज या प्रश्नावर तोडगा निघणार नाही,असेही ते म्हणाले. पंतप्रधान पुढे म्हणाले की, दहशतवाद्यांशी याकाळात कठोरपणे मुकाबला केला पाहिजे. देशाने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे संपूर्ण जगाला भारताच्या क्षमतेचे दर्शन घड़ले आहे, असेही त्यांनी नमूद केले.