‘त्या’ एक हजार ३०५ अतिक्रमणांवर बुलडोजर चालवणार-एकनाथ शिंदे

eknath shinde

परभणी : परभणीतील वाढत्या अतिक्रमणांला आळा घालण्यासाठी व शहरात सध्या असलेल्या एक हजार ३०५ अतिक्रमणांवर बुलडोजर चालवणार असल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.

विधानपरिषदेत मराठवाड्यातील काही आमदारांनी परभणी येथील वाढत्या अतिक्रमणाचा मुद्दा उचलत अतिक्रमणकर्त्यांच्या विरोधात मनपा ठोस व कठोर कारवाई करत नाही, विभागीय महसूल अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी मागील वर्षी या अतिक्रमणकर्त्यांना तात्काळ हटवावे, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु परभणी महापालिकेने कारवाई केली नाही. अतिक्रमणे हटवली नाहीत असे नमूद केले.

या प्रश्नाचे उत्तर देताना शिंदे यांनी महापालिका प्रशासनास विभागीय आयुक्तांव्दारे वांरवार सूचना दिल्या गेल्या होत्या, परभणी शहरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटवण्याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुओमोटोरीट याचिका दाखल केली होती. या रिट याचिकेत न्यायालयाने अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटविण्याकरिता 31 जाने 2021 पर्यंत स्थगिती दिली होती अशी माहिती त्यांनी दिली. न्यायालयाच्या या स्थगितीमुळे 31 जानेवारी 2021 पर्यंत अतिक्रमणे हटविण्याची कारवाई झाली नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

शिंदे यांनी सांगितले, महापालिकेने सर्वेक्षण करून एक हजार 305 अतिक्रमणांची यादी तयार केली आहे. दहा फेब्रुवारी 2021पासून सद्यस्थितीत 240 पेक्षा जास्त अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत, त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत, याचीही दक्षता घेण्यात येत असून उर्वरित सर्व अतिक्रमणे काढण्याची कारवाई, महापालिकेकडून केली जाईल. असे त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या