मोदी सरकारला जोरदार झटका ! जपानचा बुलेट ट्रेनला ब्रेक

टीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांचा विरोध डावलून ‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन’चा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करणाऱया मोदी सरकारला जोरदार झटका बसला आहे. आधी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा तरच निधी देऊ असा पवित्रा जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीने (जिका) घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक लागला आहे.

मुंबई-अहमदाबाद प्रकल्पासाठी एक लाख कोटी रुपयांचा खर्च येणार असून जपानच्या ‘जिका’कडून अर्थपुरवठा केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील शेतकऱयांची 353 हेक्टर आणि गुजरातमधील शेतकऱ्यांची 850 हेक्टर जमीन अधिग्रहीत करावी लागणार आहे. मात्र जमीन अधिग्रहणावरून वाद सुरू आहे. महाराष्ट्रातील पालघर येथील शेतकऱयांनी बुलेट ट्रेनविरुद्ध आंदोलन केले होते. गुजरातमधील शेतकरीही आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

या वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने एक विशेष समिती स्थापन केली आहे. परंतु त्यातून काहीही तोडगा निघालेला नाही. या घडामोडींमुळे अर्थपुरवठा करणाऱया जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीने बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निधी थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. आधी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा तेव्हाच निधी मिळेल असा जपानचा पवित्रा आहे.

You might also like
Comments
Loading...