तर घरावर बुलडोझर फिरवला जाईल- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ.

yogi adityanath on namaj

 

वेबटीम- उत्तर प्रदेशातील सत्तारोहणापासूनच धडाकेबाज आणि वादग्रस्त निर्णयांमुळे चर्चेत असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माता भगिनीवर वाईट नजर टाकणाऱ्या समाजकंटकाना इशारा दिला आहे.माता-भगिनींवर वाईट नजर टाकाल तर घरावर बुलडोझर फिरवला जाईल, अशा कडक शब्दात  योगी यांनी इशारा  दिला आहे. अलाहाबादमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमात बोलताना उत्तर प्रदेशच्या 22 कोटी जनतेला राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.     व्यापारी, सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी, माता-भगिनींवर वाईट नजर टाकली किंवा दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला, तर आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला जाईल, असंही ते म्हणाले.

“राज्यातील बिघडलेली कायदा-सुवस्था सुधारण्यासाठी काम सुरु आहे. वारसाहक्कात 15 वर्षांपासून बिघडलेली कायदा-सुव्यवस्था मिळाली आहे, ती सुधारण्यासाठी काही काळ लागेल,”     असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.देशभरामध्ये महिला सुरक्षा प्रश्न ऐरणीवर असताना योगिनी दिलेल्या इशार्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.