बुलढाणा जिल्हा परिषदेवर यावेळी असणार महिलाराज…!

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील महानगरपालिकांमधील आरक्षण जाहीर झाल्यानंतर, आता मंगळवारी जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली होती. राज्यातील मुंबई शहर आणि उपनगर वगळता इतर ठिकाणी एकूण ३४ जिल्हा परिषदा आहेत. या सर्व ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठीचे आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे.

यामध्ये बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण (महिला) साठी राखीव करण्यात आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांचे आगामी अडीच वर्षासाठीचे आरक्षण निश्चित होणार असल्यामुळे सगळ्यांचे त्याकडे लक्ष लागले होते. राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्या उपस्थितीत चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात आली. सध्या बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्षपद हे भाजप कडे असून उमा तायडे या जिल्हापरिषद अध्यक्षा आहे. २०१७ रोजी बुलढाणा जिल्हापरिषद निवडणूक भाजप ने जिंकल्यावर अनेकजण अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. त्या वेळी मात्र हि संधी भाजपच्या उमा तायडे यांना भेटली.

यावेळी आमदार झालेल्या जयश्री शेळके, उमा तायडे व ज्योती खेडेकर यामहिलांमध्ये काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या