राजा कायम ! भेंडवळच्या घाटमांडणीत भाकीत

buldhana-bhendwal-prediction-on-rain-weather-forecast

भेंडवळ : बहूचर्चीत भेंडवळची घटमांडणी आज पार पडली,  सकाळी सूर्योदयच्या वेळी घटामध्ये झालेल्या बदलाचे अवलोकन करून घटमांडणीची भविष्यवाणीच कथन करण्यात आली आहे. परंपरेप्रमाणे केल्या जाणाऱ्या  भाकीताकडे संपुर्ण महाराष्ट्रातील बळीराजाचे लक्ष लागल होते. दरम्यान सर्वसामान्य पाऊस राहणार असल्याच भाकीत यावेळी वर्तवण्यात आल आहे. विशेष म्हणजे देशाच्या राजकारणात उलथापालथ होत असताना मात्र राजा कायम राहणार असल्याच भाकीत म्हणजे मुख्यमंत्री -पंतप्रधान यांच्यासाठी शुभ संकेत मानला जात आहे.

हजारो शेतकऱ्यांच्या  समक्ष येणाऱ्या  हंगामाचे पिकपाण्याचे तसेच देशाचे राजकीय, आर्थिक तथा नैसर्गिक संकटाबाबत चाहुल देणारे भाकीत वर्तविण्यात आलं आहे.  यावरून यंदा देशाचा राजा कायम राहणार, पृथ्वीवर काही नैसर्गिक अरीष्ट कोसळणार नाही, अवकाळी पावसाची शक्यता आहे , पिकांचे उत्पन्न आणि धान्याच्या भावामधील तेजीमंदीचा उलगडा करण्यात आला.

यंदाच्या भाकीता विषयी कमालीची उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये होती तसेच ही मांडणी पाहण्यासाठी आणि भविष्यवाणी ऐकण्यासाठी परिसरातील शेतकरीमोठ्या संख्येन उपस्थित होता.