मुंबई : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील जाहीर सभेत अनेक मुद्द्यांवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता भाजप नेतेही पलटवार करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देत आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
शिवसेनेच्या सभेत ना मुख्यमंत्री ना पक्षप्रमुख दिसले. घाबरलेला बिथरलेला आजारी माणूस दिसले. कालच्या भाषणानं मला त्यांची दया येत आहे. मी त्यांच्या डॉक्टरांना विनंती करतो. औषधांचा डोस कमी करावा. आजारी माणसाला इतका त्रास कुटुंब का देतंय? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणेंनी व्यक्त केला आहे.
“मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा करणं हेच चुकीचे आहे. तुम्हाला टोमणे मारता येतात. पालघरच्या साधूंची हत्या झाली त्यांना अद्याप न्याय मिळत नाही. ज्या रझा अकादमीनं महाराष्ट्रात दंगली घडवल्या त्यावर बंदी घालण्याचं तुमचं हिंदुत्व नाही का? तुमच्या सोयीनुसार हिंदुत्वाची चौकट उभी करताय. शिवसैनिकांनी सोमय्यांवर हल्ला केला म्हणून सुरक्षा दिली. नवनीत राणांवर हल्ला झाला. सुरक्षा का देण्यात येते त्याचा विचार करा. वरूण सरदेसाईंना सुरक्षा का दिलीय याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी द्यावं”, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.
महत्वाच्या बातम्या –