fbpx

मुंबईत भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली

मुंबई : मुंबईतील भेंडीबाजारमधील पाकमोडिया स्ट्रीटवर हुसैनवाला बिल्डिंग ही पाच मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मुंबईतील भेंडीबाजार भागात पाकमोडिया स्ट्रीटवर आरसीवाला बिल्डिंग होती,तळमजला अधिक चार मजले अशी रचना असलेली ही इमारत गुरुवारी सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास कोसळल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत आत्तपर्यंत ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहेत तर १५ जण जखमी आहेत.

ढिगाऱ्याखाली ३० ते ३५ जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. इमारतीमध्ये एकूण नऊ कुटुंबे राहत होती. दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शेजारच्या दोन इमारतीमधील कुटुंबांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

ढिगाऱ्याखालून तीन जणांना बाहेर काढण्यात आले असून जखमींवर जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मदतकार्यासाठी घटनास्थळी एनडीआरएफचे पथकही रवाना झाल्याचे समजते. ही इमारत १०० ते १२५ वर्षे जुनी असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. सकाळची वेळ असल्याने कुटुंबातील अनेक जण घरातच होते असे समजते.