सव्वा लाख रुपयांच्या बोगस चेकप्रकरणी बिल्डरास दोन लाखांचा दंड व तरूंगवास

अहमदनगर/स्वप्नील भालेराव : अहमदनगर येथील बांधकाम व्यावसायिक राजेश कूंदनमल उपाध्ये (रा. नवीपेठ) अहमदनगर यांनी प्रविण चंद्रकांत गोफणे (रा.वाघमळा) यांचे नावे दिलेला 1लाख 25 हजार रूपयांचा कायदेशीर देणीचा धनादेश न वटता परत आला. याप्रकरणी गोफणे यांनी उपाध्ये यांच्या विरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला होता. या प्रकरणी न्यायाधीश जी.व्ही. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाली . त्यामध्ये उपाध्ये यांना दोन लाख रू. दंड तसेच 15 दिवसांचा तुरुंगवास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात फिर्यादीतर्फे अॅड.संतोष शिनारे यांनी काम पाहीले.

You might also like
Comments
Loading...