‘समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प’ – एकनाथ शिंदे

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प आज सादर केले. महाराष्ट्र हे एक ट्रिलियन अर्थव्यवस्था असणारं पहिलं राज्य आहे, असं अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करताना म्हटलं आहे. तसेच या अर्थसंकल्पाचे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. समाजातील सर्वच घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. राज्यातील पायाभूत सुविधांना चालना या अर्थसंकल्पातून मिळणार आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: