अर्थसंकल्पात जवानांना वन रँक वन पेन्शन लागू

टीम महारष्ट्र देशा : नियमित अर्थमंत्री अरुण जेटली हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल हे देशाचा अर्थसंकल्प मांडत आहेत. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून संपूर्ण वर्षाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवत सरकारकडून अनेक नव्या योजना जाहीर केल्या आहेत. दरम्यान या अर्थसंकल्पात सरकार कडून संरक्षण खात्याच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. यंदा संरक्षण खात्याचा एकूण खर्च ३ लाख कोटी रुपये असणार आहे. तसेच मिसाइल्स, निवृत्ती वेतन, मासिक पगार यासाठी देण्यात आलेल्या निधीमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.

यावेळी कार्यकारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आम्हीच 40 वर्षांपासून प्रलंबित असलेला वन रँक वन पेन्शनचा प्रश्न सोडवल्याचा दावा केला आहे. तसेच जवानांचे पगार देखील वाढवणार आहे. आतापर्यंत 35 हजार कोटी रुपयांच्या पेन्शनचे वाटप करण्यात आले आहे. शेतकरी, मध्यमवर्ग, कामगार सर्वांसाठीच हा अर्थसंकल्प फायदेशीर ठरला असून निवडणुकांपूर्वी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.