fbpx

Budget 2019 : अर्थसंकल्पाकडे अवघ्या देशाचं लक्ष

टीम महाराष्ट्र देशा- देशाचे नियमित अर्थमंत्री अरुण जेटली हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल हे देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या अर्थसंकल्पात मोदी सरकार भरघोस घोषणा करण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पाच्या स्थापित परंपरा मोडून सरकार काही सवलती देऊ शकते, असे मानले जात आहे. वैयक्तिक करदात्यांसाठी कर सवलतीची मर्यादा या अर्थसंकल्पात वाढविली जाण्याची शक्यता आहे. तसेच ८०सी अन्वये वजावटीची मर्यादा १.५ लाखांवरून २.५ लाख रुपये केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.