fbpx

Budget 2019; असंघटित कामगारांना महिना ३ हजार रुपये पेन्शन मिळणार : गोयल

टीम महाराष्ट्र देशा- देशाचे नियमित अर्थमंत्री अरुण जेटली हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल हे देशाचा अर्थसंकल्प मांडतर आहेत. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून संपूर्ण वर्षाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवत सरकारकडून अनेक नव्या योजना जाहीर केल्या जात आहेत.गोयल यांनी एक अत्यंत लोकप्रिय अशी घोषणा केली असून असंघटित कामगारांना महिना ३ हजार रुपये पेन्शन मिळणार असल्याचं जाहीर केलं आहे.

आज अर्थमंत्री पियुष गोयल भाजप सरकारचा सहावा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सरकारने महागाईला नियंत्रणात ठेवल्याचं त्यांनी म्हटलं आहे.सरकारने महागाई रोखण्यासाठी योग्य पाऊल उचलले असून आम्ही कमरतोड महागाईची कंबरच मोडली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.2020 पर्यंत प्रत्येकांना घर आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पाच्या स्थापित परंपरा मोडून सरकार काही सवलती देऊ शकते, असे मानले जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचा दावा गोयल यांनी केला आहे. भारतात परदेशी गुंतवणूक वाढली आहे. एफडीआय आम्ही 2.13 बिलियन वर घेवून गेलो. वित्तीय तुट आम्ही 3.4 टक्क्यावर आणली. सध्या महागाई दर कमी झालाआहे. आपण जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनलो असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. आता 6000 रुपये थेट खात्यात जमा करण्याची घोषणा गोयल यांनी केली आहे.

Budget 2019 live updates
-असंघटित कामगारांना महिना ३ हजार रुपये पेन्शन
-पशू आणि मत्स्यपालनासाठी कर्जात 2 टक्क्यांची सवलत – पीयूष गोयल
-21 हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना बोनस, कामगारांना 7 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा.
-सरकार सुरू करणार कामधेनू योजना; गोयल यांची घोषणा
-दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार; गोयल यांची घोषणा

-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार

-आमचे उद्देश आहे की गावाचा आत्मा कायम ठेवतानाच त्यांना शहरासारख्या सोयी देखील मिळाव्या
-अन्नधान्य सर्वांना मिळावे म्हणून आम्ही आवश्यक ती सर्व पाऊले उचलली
-आर्थिक आधारावर गरीबांना 10 टक्के आरक्षण दिले जाणार आहे
-रेरा, आणि बेनामी संपत्ती कायद्यामुळे बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी मदत करणारे ठरले आहे
-स्वच्छ भारत अभियान हे आता सरकारी आंदोलन राहिले नाही, ते लोकांनी स्वीकारलेले आंदोलन आहे
-शेअर बाजार 120 अंकांनी वधारला आहे
-मोठ्या उद्योजकांवरही कर्ज परत करण्याचा दबाव निर्माण झाला आहे
-एनपीए बाबत बँकांची खरी परिस्थिती लोकांसमोर आणा हे आरबीआयला सांगण्याची आमची हिम्मत होती
-डिसेंबर 2018मध्ये चलनवढीचा दर हा फक्त 2.1 टक्के होता
-वित्तीय तूट 3.4 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आम्हाला यश आले
-महागाईवर आम्ही नियंत्रण मिळवलं
-‘हमारी सरकारने कमरतोड महंगाई की कमर तोड दी’
-2022 पर्यंत आमचे सरकार सर्वांना घरे देणार
-शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार
-देशातील भ्रष्टाचार नष्ट केला
-आज देश जगातील सगळ्यात मजबूत अर्थव्यवस्था असलेला देश झाला

 

3 Comments

Click here to post a comment