Budget 2019 : अर्थसंकल्पातील पाच लक्ष्यवेधी घोषणा

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली असून अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये थेट जमा केले जातील, अशी घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. १२ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

असंघटीत क्षेत्रातील २१ हजार पगार असलेल्या कामगारांना ७ हजार बोनसची घोषणा केली आहे. तसेच ग्रॅच्युटीची मर्यादा १० लाखांवरून २० लाख रूपये केल्याचे गोयल यांनी जाहीर केले. याचा १० कोटी असंघटीत कामगारांना फायदा होणार आहे. कामगारांना प्रतिममहिना १०० रूपये भरावे लागणार आहेत. ६० वर्षानंतर तीन हजार पेन्शन दिली जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने मध्यमवर्गीयांना मोठी भेट दिली आहे. पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा त्यांनी केली.

‘आयुष्मान भारत’ योजनेमुळे गरिबांचे तीन हजार कोटी रूपये वाचले.‘आयुष्यमान भारत’ गोरगरिबांना उपलब्ध करून दिली. त्याद्वारे ५० कोटी लोकांवर उपचार करण्याची व्यवस्था

मोदी सरकार गायींसाठी कामधेनू योजना सुरू करणार आहे. राष्ट्रीय गोकूळ आयोगाची स्थापनी केली जाईल आणि कामधेनू योजनेवर ७५० कोटी रूपये खर्च केले जातील अशी घोषणा गोयल यांनी केली.