Budget 2019; 21 हजार रुपयांपर्यंत पगार असलेल्यांना 7 हजाराचा बोनस

टीम महाराष्ट्र देशा- देशाचे नियमित अर्थमंत्री अरुण जेटली हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल हे देशाचा अर्थसंकल्प मांडतर आहेत. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून संपूर्ण वर्षाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवत सरकारकडून अनेक नव्या योजना जाहीर केल्या जात आहेत.गोयल यांनी नोकरदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. 21 हजार पगार असलेल्यांना 7 हजार बोनस देण्यात येणार आहे.

ईपीएफओच्या माध्यमातून हा 7 हजार बोनस मिळणार असल्याचंही गोयल यांनी जाहीर केलं आहे. प्रतिमहिना 15 हजार रुपयांहून अधिक पैसे कमावणाऱ्या मजुरांना श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच मजुरांच्या मृत्यूनंतर 6 लाखांची नुकसानभरपाईसुद्धा देण्यात येणार आहे. गोयल यांनी अशीच आणखी एक एक अत्यंत लोकप्रिय अशी घोषणा केली असून असंघटित कामगारांना महिना ३ हजार रुपये पेन्शन मिळणार असल्याचं जाहीर केलं आहे. आज अर्थमंत्री पियुष गोयल भाजप सरकारचा सहावा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सरकारने महागाईला नियंत्रणात ठेवल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सरकारने महागाई रोखण्यासाठी योग्य पाऊल उचलले असून आम्ही कमरतोड महागाईची कंबरच मोडली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.2020 पर्यंत प्रत्येकांना घर आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पाच्या स्थापित परंपरा मोडून सरकार काही सवलती देऊ शकते, असे मानले जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचा दावा गोयल यांनी केला आहे. भारतात परदेशी गुंतवणूक वाढली आहे. एफडीआय आम्ही 2.13 बिलियन वर घेवून गेलो. वित्तीय तुट आम्ही 3.4 टक्क्यावर आणली. सध्या महागाई दर कमी झालाआहे. आपण जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनलो असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. आता 6000 रुपये थेट खात्यात जमा करण्याची घोषणा गोयल यांनी केली आहे.