अर्थसंकल्प २०१८: पेट्रोल आणि डिझेलबाबत घोषणाच नाही

petrol disel rate

नवी दिल्ली : मोदी सरकारला महागाई च्या मुद्द्यावरून विरोधकांनी घेरल होत, त्यामुळे यावर्षीचा अर्थसंकल्प सरकार समोर मोठे आवाहन होते. निश्चलनीकरणामुळे तसेच वस्तू आणि सेवा करामुळे घटलेले महसुली उत्पन्न तर दुसऱ्या बाजूला कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे वाढलेला खर्च. अर्थसंकल्पानंतर पेट्रोल आणि डिझेल चे भाव काय राहतील. याकडे सामन्यांचे लक्ष लागलेले आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे भाव सध्या आभाळाला भिडले असून इंधनाचे भाव कमी व्हावे म्हणून सर्व सामान्य नागरिकांची मागणी होती. मात्र या अर्थसंकल्पातून पेट्रोल आणि डिझेलबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल च्या महागाई वरून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.