Budget 2018 : खिसा फाटका, बाता हजारो कोटींच्या- राज ठाकरे

राज ठाकरे

सातारा – मोदी सरकारचा खिसा पूर्णपणे फाटका बनलाय, मात्र त्यांच्या बाता हजारो कोटींच्या भाषेत सुरू झाल्यात. जनतेला मूर्खात काढण्याचे दिवस आता संपले असून येत्या निवडणुकीत देशात आणीबाणीसदृष्य परिस्थिती आणणा-या भाजपा सरकारचा पराभव अटळ असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साता-यात केली.

काय म्हणाले राज ठाकरे?

‘ऊठ सूठ गुजरातच्या खोट्या प्रतीमेचा उदोउदो करून संपूर्ण देशाला वेड्यात काढण्याचे काम सध्या सुरू आहे. परदेशातील कोणतीही प्रमुख व्यक्ती देशात आली तर तिला केवळ गुजरातमध्येच नेले जाते. का? आमचा महाराष्ट्र नाही का? केरळ, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश अन् मध्य प्रदेशसारख्या राज्यात विकास झाला नाही का? आज मांडण्यात आलेला अर्थसंकल्प देशाचा नसून केवळ आगामी निवडणुकीचा आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पावर माझा कदापिही विश्वास नाही. जनतेला मूर्खात काढण्याचे दिवस आता संपले असून येत्या निवडणुकीत देशात आणीबाणीसदृष्य परिस्थिती आणणा-या भाजपा सरकारचा पराभव अटळ आहे.Loading…
Loading...