अर्थसंकल्प २०१८: अरुण जेटलींनी केलेल्या प्रमुख घोषणा

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी त्यांच्या कार्यकाळातला तब्बल २२ लाख कोटी रुपयांचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला.  हा अर्थसंकल्प सादर करताना जेटली व सरकारने जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर करणे अपेक्षित आहे. कारण पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूका लक्षात घेता जनतेचा रोष ओढावून घेणे त्यांना परवढणारे नाही. येत्या अर्थसंकल्पात मात्र अर्थमंत्र्यांसमोर काही आव्हाने उभी आहेत.

अर्थसंकल्पात आतापर्यंत जाहीर झालेल्या प्रमुख बाबी

 • शेतकरी कल्याणासाठी आमचे सरकार कटिबद्ध, शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करणार
 • मे २०१४ मध्ये मोदी सरकार आल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेने चांगली कामगिरी केली. भारताची अर्थव्यवस्था आता जगातील सातवी मोठी
 • तिकीटांसह सर्व कागदपत्रे ऑनलाईन मिळत असल्याने डिजीटल इंडियाकडे कल
 • ४ कोटी घरांना वीज पुरवण्याचं काम सध्या सुरु आहे
 • ट्रेनच्या तिकिटांपासून ते इतर महत्त्वाची सगळी कागदपत्र ऑनलाईन उपलब्ध
 • अर्थव्यवस्थेचा विकास दर ८ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची आशा
 • ४७० बाजार समित्या eNAM नेटवर्कने जोडल्या, उर्वरित मार्च २०१८ पर्यंत जोडल्या जातील
 • फळांचे ३ लाख कोटींचे उत्पादन, २७.५ मिलियन टन अन्नधाऩ्याचे रेकॉर्ड उत्पादन
 • गरिबांसाठी मोफत डायलेसिस सुविधा
 • शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी योग्य सोई पुरवायला राज्यांबरोबर मिळून आम्ही काम करणार
 • विशेष कृषी उत्पादन मॉडेल विकसित करण्याची गरज आहे
 • यावर्षी २७.५  मिलियन टन अन्नधांन्याचं उत्पादन घेण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आहे
 • ४७० एपीएमसी बाजारपेठा इंटरनेटने जोडण्यात आल्या आहेत, ५८५ शेती मार्केटच्या सुधारणांसाठी २ हजार कोटींची तरतूद
 • बांबू शेतीसाठी १२९० कोटी रुपयांची योजना
 • अन्न प्रक्रिया उद्योगासाठी १४०० कोटींची तरतूद करण्याचा सरकारचा निर्णय
 • १०० बिलियन डॉलरचा शेतमाल सध्या निर्यात केला जातो. त्यासाठी ४२ फूडपार्क उभारणार
 • नाबार्डच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचन सुरू आहे. त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे
 • मत्स्य शेती आणि पशूसंवर्धन विकासासाठी १० हजार कोटींची तरतूद
 • सहा कोटींपेक्षा जास्त शौचालयं उभारण्यात आली, पुढील वर्षात २ कोटी शौचालयं उभारण्याचा निर्धार