कांद्याच्या दरासाठी बच्चू कडू काढणार मुक्काम मोर्चा

टीम महाराष्ट्र देशा – आमदार बच्चू कडू आणि त्यांची आंदोलने हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आमदार बच्चू कडू आता कांदा उत्पादकांच्या प्रश्नात लक्ष देणार आहेत. कांदा योग्य दराने विकला जावा यासाठी येत्या २६ डिसेंबर रोजी चांदवड येथे मुक्काम मोर्चा काढणार आहेत. कांद्याचे दर सतत कोसळत आहेत. राज्य व केंद्र सरकारवर कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहेत. कांदा प्रश्नावर आता बच्चू कडू लक्ष घालणार असल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

काही दिवसापुर्वीच बाजार समितीचे भाजपचे पदाधिकारी थेट पंतप्रधानांना साकडे घालुन परतले. तरीही या परिस्थिती काही बदल झाला नाही. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे चांदवड येथे 26 डिसेंबरला कांदा प्रश्नावर आणि शेतकऱ्यांच्या इतर समस्यांवर प्रांताधिकारी कार्यालयावर मुक्काम मोर्चा काढण्यात येणार आहे. तर या आंदोलनाचे नेतृत्व स्वतः बच्चू कडू करणार आहेत. त्यामुळे आता चर्चा तर होणारच.