fbpx

कॉंग्रेसचं गणित बिघडणार, मायावतींचा स्वबळाचा नारा

टीम महाराष्ट्र देशा- आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचं काम कॉंग्रेसकडून सुरु आहे. मात्र मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रेसचं गणित काहीसं बिघडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. आघाडी करण्यास नकार देत बहुजन स माज पक्षाने राज्यातील सर्व 230 जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.

नेमकं काय म्हणणे आहे बसपाचे ?
प्रसारमाध्यमांमध्ये आमच्या आघाडीबाबत चर्चा सुरु असली तरी,पुढील निवडणुकीत बसपासोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेसची कुठल्याही प्रकारची चर्चा सुरु नाही आहे. आघाडीसाठी राज्य आणि केंद्रीय स्तरावर आमची कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही काँग्रेससोबत आघाडीसाठी केंद्रीय नेतृत्वाकडून मला कोणत्याही प्रकारची सूचना देण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत आम्ही राज्यातील सर्व 230 जागांवर निवडणूक लढवणार आहोत.- नर्मदा प्रसाद अहिरवार ,अध्यक्ष,बसपा मध्य प्रदेश

कॉंग्रेसची सावध भूमिका
आघाडीसाठी आम्ही कुठल्याही पक्षाचे नाव घेतलेले नाही. काँग्रेस पक्ष मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये समविचारी पक्षासोबत जाऊ,असे पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे.- माणक अग्रवाल ,मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रसारमाध्यमप्रमुख

1 Comment

Click here to post a comment