आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मायावती यांची मागणी

Mayawati resigns from Rajya Sabha

नवी दिल्ली : अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यातील सुधारणांचं विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याचं स्वागत बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केलं आहे. कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांचं आपण स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र यावेळी अल्पसंख्यांकांना आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली. गरीब मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण देण्याची व्यवस्था असायला हवी, असं त्या म्हणाल्या आहेत.

अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यात सुधारणा करणारं विधेयक लोकसभेनं मंजूर केलं आहे. आता या विधेयकाला राज्यसभेतही मंजुरी मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दलित समुदायानं 2 एप्रिलला भारत बंद पुकारल्याचा हा परिणाम असल्याचं मायावती म्हणाल्या. याचं श्रेय बसपाच्या कार्यकर्त्यांनादेखील जातं, असंही त्यांनी म्हटलं.

नोव्हेंबर संपण्यापूर्वी आरक्षणाची वैधानिक प्रक्रिया पूर्ण होणार – मुख्यमंत्री

शरद पवारांनी शक्य असूनही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही : विनायक मेटे