देशात प्रभू रामापासून शिवाजी महाराज, गांधी, नेहरूंचे पुतळे, मग माझ्याच पुतळ्यावर आक्षेप का?

blank

टीम महाराष्ट्र देशा: उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपच्या प्रमुख मायावती यांनी आपल्या सत्ताकाळात स्वत:चे पुतळे उभारल्याने मोठी खळबळ उडाली होती, मायावती या आपली प्रसिद्धी करण्यासाठी जनतेच्या पैशाचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता, दरम्यान, या प्रकरणी दाखल याचिकेवर आपली बाजू मांडताना मायावती यांनी देशात शिवाजी महाराजांपासून गांधी, नेहरूंचे पुतळे आहेत, मग माझ्याच पुतळ्यावर आक्षेप का ?, असा सवाल केला आहे.

मायावती यांनी स्वत:चे आणि पक्षाचे चिन्ह असणाऱ्या हत्तीचे पुतळे लखनऊ आणि नोएडामध्ये काही ठिकाणी उभारले आहेत. या प्रकरणी त्यांनी जनतेचे पैसे परत करावे अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.

देशात मूर्ती आणि स्मारक उभारण्याची जुनी परंपरा आहे, गुजरातमध्ये ३ हजार कोटी रुपये खर्चून सरदार सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बांधण्यात आला. मुंबईत देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधण्यात येत आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारने प्रभू रामाचा पुतळा उभारण्यासाठी २०० कोटींची घोषणा केली आहे. कॉंग्रेस आणि काँग्रेस सरकारच्या काळात पुतळे आणि स्मारक उभी करण्यासाठी जनतेचा पैसा वापरण्यात आला आहे. मग मग दलित नेत्यांच्या पुतळ्यांवर आक्षेप का असा प्रश्न मायावती यांनी यावेळी विचारला आहे.

माझे पुतळे उभारणे ही लोकांची भावना होती. बसपाचे संस्थापक काशीराम यांचीही इच्छा होती. दलित आंदोलनातील माझ्या योगदानाची दखल घेऊन हे पुतळे उभारण्यात आले आहेत. अस देखील मायावती यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे.