बीएसएनएलची प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष ऑफर !

बीएसएनएल

नवी दिल्लीः टेलीकॉम क्षेत्रामध्ये भारत संचार निगम लिमिटेड हि एक भारतीय राज्य मालकीची दूरसंचार कंपनी आहे, बीएसएनएलचे मुख्यालय नवी दिल्ली, येथे आहे. १ ऑक्टोबर २००० रोजी हे भारत सरकारचे दूरसंचार विभाग, संचार मंत्रालय यांनी एकत्रित केले. हे देशभरातील दूरसंचार नेटवर्कद्वारे मोबाईल व्हॉईस आणि इंटरनेट सेवा प्रदान करते. ही भारतातील सर्वात मोठी वायरलाइन टेलिकम्युनिकेशन नेटवर्क कंपनी आहे जी 60% पेक्षा जास्त मार्केट शेअर आणि चौथी मोठी वायरलेस टेलिकम्युनिकेशन ऑपरेटर आहे.

याच बीएसएनएलने प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष ऑफर लाँच केली आहे. बीएसएनएलच्या या ऑफर मध्ये कंपनी २३९९ रुपये आणि १९९९ रुपयांचे दोन लाँग टर्म प्लानध्ये अतिरिक्त वैधता देत आहे. बीएसएनएलने एक नवीन एसटीव्ही ३९८ रुपयांचा एक लाँच केला आहे. याशिवाय टेलिकॉम कंपनीने व्हाइस कॉलवरून एफयूव्ही लिमिट हटवली आहे. याआधी कंपनीच्या सर्व प्लानमध्ये ही लिमिट २५० मिनिट होती. बीएसएनएलने आता १२० रुयपांहून जास्त सर्व टॉप अप वर फुल टॉकटाइम व्हॅल्यू देण्याची घोषणा केली आहे.

भारत संचार निगम लिमिटेडने आपल्या १९९९ रुपयांच्या वार्षिक प्लानची वैधता २१ दिवसांनी वाढवली आहे. रिपब्लिक डे २०२१ ऑफर अंतर्गत आता या प्लानची वैधता ३८६ दिवसांची झाली आहे. ही एक्स्ट्रा वैधता ऑफर ३१ जानेवारी २०२१ पर्यंत आहे.

१९९९ रुपयांच्या प्लानमध्ये देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. या प्लानमध्ये ३ जीबी डेटा आणि १०० एसएमएस रोज मिळतो. याशिवाय युजर्संना सब्सक्रिप्शन ३६५ दिवसांसाठी फ्री मिळते. या प्लानमध्ये इरोस नाउचे सब्सक्रिप्शन एक वर्षासाठी मिळते.

बीएनएनएलने रिपब्लिक डे २०२१ ऑफर अंतर्गत २३९९ रुपयांच्या प्लानची वैधता ७२ दिवसांनी वाढवली आहे. आता या प्लानची वैधता ४३७ दिवसांची झाली आहे. ग्राहकांना याचा फायदा ३१ मार्चे २०२१ पर्यंत मिळू शकतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, १०० एसएमएस रोज, ३ जीबी डेटा रोज, आणि इरोस नाउचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते.

महत्वाच्या बातम्या