काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीचेही अस्तित्व संपणार : येदियुरप्पा 

उदगीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताची संकल्पना राबवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीचे अस्तित्व संपवणार असल्याची टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांनी केली.गुरुवारी (ता.17) रोजी येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर भाजपा-सेना महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कर्नाटकचे मंत्री प्रभू चव्हाण, बिदरचे खासदार भगवंत खुबा, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे; उपस्थित होते.

येदियुरप्पा म्हणाले,केंद्रात दहा वर्षे व राज्यात पंधरा वर्षे सत्ता असूनही काँग्रेस आघाडीने विकास कामे केली नाहीत. गेल्या पाच वर्षात भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विकासाची कामे सुरू केली आहेत.भाजप सरकारने नदी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. नदीजोड निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या मागण्या मान्य करण्याची शिफारस आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी सांगितले.

यावेळी डॉ कांबळे म्हणाले, मागच्या पाच वर्षात केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी , शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना आणलेल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या