भावा जिंकलंंस : भारताच्या मुहम्मद अनासला सुवर्ण

टीम महाराष्ट्र देशा – भारताचा धावपटू मुहम्मद अनास याहियाने झेक रिपब्लिकमधील स्पर्धेत ४०० मीटरचे अंतर ४५.२४ सेकंदात पार करत सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीसह त्याने नवा राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला. काही महिन्यांपूर्वी गोल्ड कोस्टमध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये मोहम्मदने ४५.३१ अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेत मोहम्मदला पदकाने हुलकावणी दिली होती.

Loading...

राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत मिल्खा सिंगनंतर प्रवेश करणारा अनास हा दुसरा भारतीय ठरला. मिल्खा सिंग यांनी १९५८मध्ये ४४० यार्ड शर्यतीत सुवर्णपदक पटकावले होते. अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाने (AFI) ट्विट करत मुहम्मद अनास आणि प्रशिक्षक गलिना बुखारिना यांचे अभिनंदन केले.

अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाने (AFI) ट्विट करत मुहम्मद अनास आणि प्रशिक्षक गलिना बुखारिना यांचे अभिनंदन केले आहे. याव्यतिरीक्त एम. आर. पुवम्मानं देखील महिलांच्या ४०० मीटरची शर्यत ५३.०१ सेकंदात पार करत भारतासाठी सन्मान मिळवला. धावपटू राजीव अरोकिया यानेही २०० मीटरचे अंतर २०.७७ सेकंदात पार केले.

 

 

 Loading…


Loading…

Loading...