भावा तूच! दीपकच्या विजयी चौकारावर बहिणीने शेअर केली भन्नाट पोस्ट

chahar

श्रीलंका : राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली आणि शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत टीम श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने दमदार विजय मिळवला. दुसरा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली.

भारताच्या विजयासाठी 276 धावांचं लक्ष असताना पहिल्या आणि मधल्या फळीतील आघाडीचे बॅट्समन स्वस्तात माघारी परतले. 193 धावांवर सात विकेट्स असताना विजयाची आशा मावळली होती. हातात ३ विकेट्स असताना ८३ धावांची गरज होती. अशात दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमारने केलेली भागीदारी ही निर्णायक ठरली. या दोन्ही खेळाडूंनी संयमी खेळी केली आणि श्रीलंकेच्या घशातून हा विजय खेचून आणला.

या विजयात सातव्या क्रमांकावर आलेल्या दीपक चाहरचे मोठे योगदान होते. दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमारच्या भागीदारीने हा विजय शक्य झाला. या विजयात मोठा वाटा वाचलेल्या दीपक चाहरचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. तसेच दीपक चाहरच्या या उत्कृष्ठ कामगिरीचे कौतुक बहीण मालती चाहरने देखील केले. तिने या सामन्यातील विजयी चौकारचा व्हिडिओ शेअर करत लिहिले, ‘भावा तू करून दाखवलंस, भारतीय संघाला सामना जिंकून दिला तसेच तू चाहत्यांची मन देखील जिंकली. तू स्टार आहेस, चमकत रहा.’ चाहरच्या बहिणीने केलेलं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच या ट्विटला भरभरून कमेंट्स देखील येत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

IMP